Posts

Showing posts with the label In your memories

तुझ्या आठवणीत...!

तुझ्या आठवणीतल्या जगात राहताना  खूप काही सांगायचे राहिले. आता आठवल्यावर मात्र  ते दिवस स्वप्नात समोर आले.  ओठावर शब्द उमठताना  बोलायचेच राहून गेले.  सांगता सांगता मग  ते शब्द मनातच लपून बसले खूप काही ऐकायचे राहिले  शब्दांसाठी मन तरसत राहिले  दिवसेदिवस  ते मग  असाच हळूच रडत राहिले  हात तुझा पकडताना  विचार करायचे राहून गेले  आयुष्य हे जगताना  पुढचे सगळे विसरून गेले