Posts

Showing posts with the label life struggles

जीवन ..!

Image
खूप वाटत मनापासून ,उंच भरारी घेऊन  पाखरासारख  शांत फिराव ..! मनाला त्या घेऊन,शांत कुठेतरी  रमून जाव ..! दगादगीच्या या जीवनात ,वेळ असतो  तरी कुणाला कुणासाठी ? आयुष्यात मग स्वतःला च , हसवाव लागत केव्हातरी ..! हसत हसत कधी कधी, रडत पण हे मन ..! सुखदुखाच्या या गुंतागुंतीतल, असच असत हे जीवन ..! दूसरयाला रडवल्यावर स्वतः हसण, मात्र सोप असत ..! पण ,दुसरे रडताना त्यांना हसवण , तीतकच अवघड असत ..! जीवनावर बोलताना ,जीवनाबद्दल  सांगण फार सोपं असत ..! पण प्रत्यक्षात हे आयुष्य, जगणच फार अवघड असत ..!