Posts

Showing posts with the label what is life

जीवनाची ही गुंतागुंत

Image
दिवसामागून दिवस जातात आठवणी मात्र तशाच उरून जातात हळूहळू मग त्या दिवसेंदिवस आठवत राहतात. हसत हसत,रमत गमत स्वप्नामध्ये राहत जातात अशीच मग कधीतरी गालावर हसू देऊन जातात. खूप काही सांगायचं असत पण शब्द फुटायला तयार नसतात न बोलता मात्र ते खूप काही सांगून जातात . आजकालच्या या गर्दीत प्रत्येकजण हा एकटाच असतो स्वतःचे मन ऐकवण्यासाठी कुणीतरी शोधत असत. जीवनात हे अस नेहमीच घडत असत म्हणूनच हृदयावर हात ठेवून फक्त ALL IZZ WELL म्हणायचं असत. 

जीवनाबद्दल काही...!

जीवन कसं जगायचं हे कुणालाच कळत नसतं  कारण जीवन म्हणजे नक्की काय हे कुणालाच माहित नसतं  नशीब हे जीवनातून घडवायचं असतं  म्हणून जीवन हे नीट जगायचं असतं... जीवनात सारं काही समवालेलं असतं  कारण जीवनातूनच मनुष्य घडत असतो  जीवनातलं दुःख नशीबाला सांगून  सुखाचा मार्ग शोधायचा असतो... जीवन म्हणजे Life असतं  परंतु Life  is Money असतं  Money is Important असतं  अणि Important म्हणजेच जीवन असतं... जीवनात खूप करण्याजोगं असतं  कारण प्रयत्नानीच फळ मिळत असतं  करण्यासारखं असलं तरी करण्याइतकं सोपं नसतं कारण प्रयत्नाशिवाय जीवन घडत नसतं...