नाते हे
दिवसांच्या वाटेतून दिवस हे असेच निघुन गेले पण तरीही आपले हे मैत्रीचे नाते असेच हे जपून राहिले.... नकळत हे नाते हळूहळू हळूच सांगून गेले माझे हे स्वप्न मलाच हरवून गेले.... जगातल्या या दगदगीत अशी रविकिरणे असतात ही जगताना जगायला शिकवतात ही.... धुंद या आकाशात अशीच राहू दे मैत्री आपली एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणारी अशी पापण्या मीटताना जो आनंद मिळतो तशी.... वचन दे मला अशीच निखळ आणि खोल असेल हे नाते जीवनाच्या शेवटपर्यंत साथ निभावेल हे असे....