Posts

Showing posts with the label changes in life

बदलले हे जीवन

खूप दिवस गेले ,खूप रात्रीही गेल्या नकळत मग मनात हलक्याशा त्या आठवणी आल्या  खरच ते दिवस खरच खूप वेगळे होते  त्या सुखाच्या दिवसात असेच दिवस जात होते  एकटे होते मन माझे एकट्या होत्या भाषा  आता मग या जीवनात त्या आठवणी आ अशा  दिवस सुरु व्हायचा हळूवार त्या किरणानी  कॉलेजच्या त्या दिवसात रंगायचे मी गप्पांनी  ज्यांच्या विचारांच्या मनात गुंताव असे खूप होते जवळचे... ढगात जसे ढग जातात तसेच माझ्या मनाचे झाले जवळच्या त्या लोकांत मग मग हळूहळू रमत गेले... दिवसामागून दिवस जात दिवस असे निघुन गेले  दिवसातल्या त्या सहवासात मग हे जीवनच बदलून गेले...