गावाकडचे ते दिवस
गावाकडच्या ती हवा , आठवणीत राहून गेली. गेलेल्या त्या दिवसात, थोडी भर घालून गेली। शांत त्या झाडांच्या सावलीत, घालवले होते ते क्षण. लपंडावाच्या त्या आठवणीत रमले होते मन। चांदण्याकडे बघत बघत, स्वप्नात हरवले होते. सकाळची किरणे पडताच, रात्रीपर्यंत खेळले होते। भल्या मोठ्या त्या घोळक्यात, खेलले होते खेळ. घरच्या वाटेवरुन जात जात गेला होता तो वेळ। असेच विचार करताना मग, मागे परत जावेसे वाटले. मोठे जालो आपण म्हणून, एकटेच खूप रडावेसे वाटले।