Posts

समजावताना मग ..!

स्वप्नात हरवून जाताना , विसरून गेले स्वतःला ! रडत रडत हसताना , सांगून  गेले मनाला ! मग .. असच जीवन जगताना , समजावत गेले हृदयाला !

जीवन ..!

Image
खूप वाटत मनापासून ,उंच भरारी घेऊन  पाखरासारख  शांत फिराव ..! मनाला त्या घेऊन,शांत कुठेतरी  रमून जाव ..! दगादगीच्या या जीवनात ,वेळ असतो  तरी कुणाला कुणासाठी ? आयुष्यात मग स्वतःला च , हसवाव लागत केव्हातरी ..! हसत हसत कधी कधी, रडत पण हे मन ..! सुखदुखाच्या या गुंतागुंतीतल, असच असत हे जीवन ..! दूसरयाला रडवल्यावर स्वतः हसण, मात्र सोप असत ..! पण ,दुसरे रडताना त्यांना हसवण , तीतकच अवघड असत ..! जीवनावर बोलताना ,जीवनाबद्दल  सांगण फार सोपं असत ..! पण प्रत्यक्षात हे आयुष्य, जगणच फार अवघड असत ..!

गावाकडचे ते दिवस

Image
 गावाकडच्या ती हवा , आठवणीत राहून गेली. गेलेल्या त्या दिवसात, थोडी भर घालून गेली। शांत त्या झाडांच्या सावलीत, घालवले होते ते क्षण. लपंडावाच्या त्या आठवणीत रमले होते मन। चांदण्याकडे बघत बघत, स्वप्नात हरवले होते. सकाळची किरणे पडताच, रात्रीपर्यंत खेळले होते। भल्या मोठ्या त्या घोळक्यात, खेलले होते खेळ. घरच्या वाटेवरुन जात जात गेला  होता तो  वेळ। असेच विचार करताना  मग, मागे परत जावेसे वाटले. मोठे जालो आपण म्हणून, एकटेच खूप रडावेसे वाटले।

आठवणीतले प्रेम...!

तुझ्या डोळ्यातल्या त्या प्रेमाने, हळूच हसऱ्या  त्या इशाऱ्याने. प्रेमात घेतलेल्या त्या काळजीने, होते हे असे , आठवणीत मन रडते हे कशाने ....! न बोलत्या त्या शब्दाने, हसता हसता रडणाऱ्या त्या डोळ्याने. नकळतच असे, तुझ्यात मन गुंतते हे कशाने...!

Introduction

Hi World, Wish you Warm blessings. I have created this blog to update you with my poetry which i used to write in my spare time. Hope you all are going to enjoy our Marathi. Jay Marathi.