Posts

Showing posts from August, 2013

जीवनाबद्दल काही...!

जीवन कसं जगायचं हे कुणालाच कळत नसतं  कारण जीवन म्हणजे नक्की काय हे कुणालाच माहित नसतं  नशीब हे जीवनातून घडवायचं असतं  म्हणून जीवन हे नीट जगायचं असतं... जीवनात सारं काही समवालेलं असतं  कारण जीवनातूनच मनुष्य घडत असतो  जीवनातलं दुःख नशीबाला सांगून  सुखाचा मार्ग शोधायचा असतो... जीवन म्हणजे Life असतं  परंतु Life  is Money असतं  Money is Important असतं  अणि Important म्हणजेच जीवन असतं... जीवनात खूप करण्याजोगं असतं  कारण प्रयत्नानीच फळ मिळत असतं  करण्यासारखं असलं तरी करण्याइतकं सोपं नसतं कारण प्रयत्नाशिवाय जीवन घडत नसतं...

माझे मन,माझे विचार

Image
खूप वाटत की कोणीतरी असाव, मनाला जाणणारं ,मनाला ओळखणारं, मनाला समजून घेणारं आणि मनापासून आवडणारं ! गरज भासते कुणाचीतरी, रडताना आवडणाऱ्याची,दुःखात सुख देणाऱ्याची, आणि इच्छाना  वाव देणाऱ्याची ! खुप वाटत मनाला कुणाजवळ तरी मन  मोकळ  करता यावं, अश्रू पुसणारं कोणीतरी असावं,मन ज्याला मानतं असं कोणीतरी असावं ! मैत्रिणीतर भरपूर असतात पण, त्यातली एकच सखी असते,एकच जिव्हाळा असते ! मनालाही वाटतं की कोणीतरी मित्रही असावा, आपल्याला साथ देणारा,मनापासून आवडणारा, मन जाणणारा,मदत करणारा,जिव्हाळा असणारा, मैत्रीचा हात पुढे करणारा ! मावळलेल्या सुर्याचा दिवस तर उजाडलेच, माझ्या रुसलेल्या मनाला हसवणारा कुणीतरी येईलच !