नवीन वर्ष - ध्यास जीवन घडवायचा
नवीन वर्ष घेऊन येते नवीन किरणे
नवीन आशा आणि नवीन दिशा
बदलतो तो फक्त नव्याने बघायचा दृष्टीकोन
आणि नव्याने करायचे प्रयत्न
काही गोष्टी तश्याच आठवणीत राहतात
म्हणून काय जगणं कोणी सोडतं का ?
दुखः हि खूप येतात आणि जातात
म्हणून काय हसणं कोणी सोडतं का ?
आशेची किरणं तर दररोज उगवतात
गेलेली दुखः हि दररोज मावळतात
फक्त राहतो तो आपला अंतरात्मा
नव्याने जगणारा आणि नव्याने हसवणारा !
आयुष्य हे असच असतं उंच भरारी घेणाऱ्या पक्ष्यासारखं
अथांग प्रयत्नांनी आभाळाला टेकणारा
मनाला लागतो तो फक्त थोडासा धीर
मग बघा आयुष्य हे किती सुंदर आहे ते !
नवीन वर्ष हे भरारी घेणारं जावो
सर्व इच्छा तुमच्या लवकर पूर्ण होवोत
करायचा आहे तो फक्त ध्यास
जगायला जिंकायचा , जीवन जगायचा, नव्याने प्रयत्नांचा, हसत जगायचा आणि जीवन घडवायचा ध्यास…!
Very Nice Dear...!! Keep Posting.
ReplyDelete