रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
बंधन हे नात्यांचे, सुख दुःख आणी आशीर्वादाचे
रक्षा बंधन हे धाग्यातले केलेल्या त्या वचनांचे
वडिलांसारखा सुरक्षा देणारा भाऊ
आईसारखी माया देणारी बहिण
प्रत्येकाला असावा अस एक नातं
परीवारासारखं आणी आयुष्यभर आपलं असणारं
बंधन असते हे मोलाचे
कधी भांडणारे तर कधी प्रेम करणारे
जीवनभर हे असेच राहावे
नाते हे भाऊबंद मैत्रीतले
आयुष्यात सुख दुःख तर येतच राहतात
जीवनभर शेवटी बंधनच राहतात
कधी हरवतात कधी जुळतात
आयुष्यात शेवटी फक्त नातीच राहतात
म्हणूनच हे नाते जपून ठेवा
बहिण आणि भावांच्या भावनेला जपा
अतूट बंधनाला जीवनभर ठेवा
वेगळी एक हि अशी जागा बनवून ठेवा
नात्यांना शेवट नसतो, बंधनही नसते
आपलसं करायची हे एक ओढ असते
फक्त आठवणीतच नवे तर
आपणच आपल्या नात्यांना जपायचे असते
म्हणूनच हा सण आहे भावबंधांचा
भाऊ आणि बहिणींचा
शुभेच्छा तुम्हाला या गोड नात्याच्या
सर्वांना रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
Amazing Rasika..!!!
ReplyDeleteThank you so much for your valuable reply
Deletenice poem rasi.... keep it up
ReplyDeleteThanks Priyanka... ;-)
DeleteUltimate Rossi! Keep it up..
ReplyDeleteYou are welcome Pragati...
Delete