सुपर गायक यो यो हनी सिंघ ने धडाकेदार पुनरागमन करत आपलं नवीन गाणं प्रसारित केले . श्री गुलशन कुमार यांच्या आठवणीतलं हे गाणं आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन आणि अभिनेत्री सोनम कूपर यांच्यावर हे गाणं चित्रित झालं आहे.
बंधन हे नात्यांचे, सुख दुःख आणी आशीर्वादाचे रक्षा बंधन हे धाग्यातले केलेल्या त्या वचनांचे वडिलांसारखा सुरक्षा देणारा भाऊ आईसारखी माया देणारी बहिण प्रत्येकाला असावा अस एक नातं परीवारासारखं आणी आयुष्यभर आपलं असणारं बंधन असते हे मोलाचे कधी भांडणारे तर कधी प्रेम करणारे जीवनभर हे असेच राहावे नाते हे भाऊबंद मैत्रीतले आयुष्यात सुख दुःख तर येतच राहतात जीवनभर शेवटी बंधनच राहतात कधी हरवतात कधी जुळतात आयुष्यात शेवटी फक्त नातीच राहतात म्हणूनच हे नाते जपून ठेवा बहिण आणि भावांच्या भावनेला जपा अतूट बंधनाला जीवनभर ठेवा वेगळी एक हि अशी जागा बनवून ठेवा नात्यांना शेवट नसतो, बंधनही नसते आपलसं करायची हे एक ओढ असते फक्त आठवणीतच नवे तर आपणच आपल्या नात्यांना जपायचे असते म्हणूनच हा सण आहे भावबंधांचा भाऊ आणि बहिणींचा शुभेच्छा तुम्हाला या गोड नात्याच्या सर्वांना रक्षा बंधनाच्या हार्...
नवीन वर्ष घेऊन येते नवीन किरणे नवीन आशा आणि नवीन दिशा बदलतो तो फक्त नव्याने बघायचा दृष्टीकोन आणि नव्याने करायचे प्रयत्न काही गोष्टी तश्याच आठवणीत राहतात म्हणून काय जगणं कोणी सोडतं का ? दुखः हि खूप येतात आणि जातात म्हणून काय हसणं कोणी सोडतं का ? आशेची किरणं तर दररोज उगवतात गेलेली दुखः हि दररोज मावळतात फक्त राहतो तो आपला अंतरात्मा नव्याने जगणारा आणि नव्याने हसवणारा ! आयुष्य हे असच असतं उंच भरारी घेणाऱ्या पक्ष्यासारखं अथांग प्रयत्नांनी आभाळाला टेकणारा मनाला लागतो तो फक्त थोडासा धीर मग बघा आयुष्य हे किती सुंदर आहे ते ! नवीन वर्ष हे भरारी घेणारं जावो सर्व इच्छा तुमच्या लवकर पूर्ण होवोत करायचा आहे तो फक्त ध्यास जगायला जिंकायचा , जीवन जगायचा, नव्याने प्रयत्नांचा, हसत जगायचा आणि जीवन घडवायचा ध्यास…!
खूप दिवस गेले ,खूप रात्रीही गेल्या नकळत मग मनात हलक्याशा त्या आठवणी आल्या खरच ते दिवस खरच खूप वेगळे होते त्या सुखाच्या दिवसात असेच दिवस जात होते एकटे होते मन माझे एकट्या होत्या भाषा आता मग या जीवनात त्या आठवणी आ अशा दिवस सुरु व्हायचा हळूवार त्या किरणानी कॉलेजच्या त्या दिवसात रंगायचे मी गप्पांनी ज्यांच्या विचारांच्या मनात गुंताव असे खूप होते जवळचे... ढगात जसे ढग जातात तसेच माझ्या मनाचे झाले जवळच्या त्या लोकांत मग मग हळूहळू रमत गेले... दिवसामागून दिवस जात दिवस असे निघुन गेले दिवसातल्या त्या सहवासात मग हे जीवनच बदलून गेले...